रोजच्या आहारात काय खावे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:38

रोजच्या आहारात काय खावे?

आजारांना दूर ठेवायचे असल्यास जेवणात विविध पालेभाज्या, कडधान्ये, मोसमी फळे, सुका मेवा यांचा समावेश करणे गरजेचे असते. 

निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे पौष्टिक आहार. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जंक फूड खाणे वाढल्याने विविध आजारांचेही प्रमाण वाढू लागलेय. खरे तर जंक फूडदेखील शाकाहारीच असते. मात्र त्यामुळे तुमच्या व्याधी वाढू शकतात. त्यामुळे केवळ शाकाहारी असून भागणार नाही तर तुम्ही कोणत्या प्रकारचा शाकाहार करता हे-देखील तितकेच महत्वाचे आहे. 

आजारांना दूर ठेवायचे असल्यास जेवणात विविध पालेभाज्या, कडधान्ये, मोसमी फळे, सुका मेवा यांचा समावेश करणे गरजेचे असते. आपल्या दीर्घ आणि सुदृढ आयुष्यासाठी या पदार्थांचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश करा. हिरव्या भाज्या खाणे फार उत्तम असते कारण या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात सत्त्व असतात. कडधान्ये भूक भागवण्यास फार मदत करतात. त्याचप्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठीही कडधान्ये मदत करतात. 

शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी कडधान्यांतील फायबर उपयुक्त असते. आठवड्यात किमान दोनदा जेवणांत कडधान्यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज फार कमी असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोकाही नसतो. हिरव्या भाज्या डोळ्याच्या दृष्टीसाठीही खूप उपयुक्त असतात. यातील काही घटक कर्करोगालाही दूर ठेवण्यास मदत करतात. 

कांद्यासोबतच, कांद्याची पात, लसूण यांसारख्या पदार्थांचा आहारातील समावेश रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे मधुमेहासारख्या आजारांवरही कांदा फार गुणकारी आहे. कांद्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तो बारीक कापून, ठेचून किंवा खूप वेळेस चावून खाणे गरजेचे आहे. कर्करोगांच्या पेशींची वाढ थांबवण्यासही बऱ्याच प्रमाणात मदत करतात. बेरी हे फळ आरोग्यासाठी सर्वात चांगले. ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, ब्लॅकबेरीज या फळांमध्ये शर्करेचे प्रमाण कमी असते पण त्यात जीवनसत्वे मात्र मोठ्या प्रमाणात असतात. बिया आणि ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्याचप्रमाणे त्यात खनिजेही असतात. यामुळे ड्रायफ्रूट्स खाणे फायद्याचे असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info